Ad will apear here
Next
संचेती रुग्णालयात स्मरणशक्ती पुनर्वसन केंद्र स्थापन
ब्रेननेक्स्ट टूल्स सेंटरच्या शुभारंभाप्रसंगी (डावीकडून) डॉ. अमृता पोतदार, न्यूरोसायकोलॉजिस्ट डॉ. मंगल कर्डिले, संचेती रुग्णालयाचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती, न्यूरो फिजिशियन डॉ. नीलेश भंडारी व न्यूरोसर्जन डॉ. अमोल महाजनी

पुणे : ‘अपस्मार, विसराळूपणा, पॅरालिसिस तसेच मेंदूशी संबंधित विकारांनी ग्रस्त रुग्णांचे पुनर्वसन करण्याकरिता संचेती रुग्णालयात स्मरणशक्ती पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तेथे ‘ब्रेननेक्स्ट टूल्स’द्वारे मेंदूच्या विकारांवर उपचार करण्यात येणार आहे,’ अशी माहिती संचेती रुग्णालयाचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती आणि न्यूरोसायकोलॉजिस्ट डॉ. मंगल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘ब्रेननेक्स्ट टूल्स’चे संशोधन न्यूरोसायकोलॉजिस्ट डॉ. मंगल कर्डिले यांनी केले आहे. या वेळी न्यूरो फिजिशियन डॉ. नीलेश भंडारी, न्यूरोसर्जन डॉ. अमोल महाजनी उपस्थित होते. 

‘विस्मरणाच्या रुग्णांसाठी नवी थेरपी शोधण्यात आली आहे. ब्रेननेक्स्ट टूल्समध्ये १८ संचात पाचशेहून अधिक प्रकारच्या मेंदूविषयक व्यायामांची साधने उपलब्ध आहेत. ही साधने सहा महिन्यांच्या बालकापासून ते वृद्धांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. चार ते पाच हजार रुपयांना एक टूल उपलब्ध होणार आहे,’ अशी माहिती डॉ. कर्डिले यांनी दिली.

‘मेंदूला होणाऱ्या विविध इजा आणि विकारांमुळे स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होतात. चेहरे, जागा, रस्ते ओळखण्यामध्ये समस्या, निराशा, उदासीनता, आक्रमकता अशा अनेक समस्या दिसून येतात. अनेक प्रकारे मेंदूला इजा होऊन पेशी कमकुवत होतात. त्यामुळे मेंदूचे विकार संभवतात. या आजारांकरिता नेमके कुठलेही औषध नसल्याने अशा रुग्णांचे दीर्घकालीन पुर्नवसन करणे हाच पर्याय आहे. त्याकरता मेंदूविषयक व्यायामांची साधने विकसित केली असून, प्रत्येक रूग्णाला वैयक्तिक गरजेप्रमाणे रोज दोन ते चार तास हे व्यायाम करणे आवश्यक आहे. पुनर्वसनाच्या प्रक्रियेला तीन ते पाच  महिने लागू शकतात आणि म्हणूनच संयम आणि सातत्य उपयुक्त ठरते,’ असेही डॉ. कर्डिले यांनी नमूद केले.

डॉ. कर्डिले पुढे म्हणाल्या, ‘ही साधने कुटुंबातील सदस्य, आरोग्यसेवा पुरवठादार, हॉस्पिटलचे कर्मचारी वापरू शकतात. किफायतशीर, सुरक्षित, टिकाऊ व वापरण्यास सोपे आहे. याचबरोबर अंधरूग्णांसाठीदेखील विशेष साधने विकसित केली गेली आहेत.’

डॉ. के. एच. संचेती म्हणाले, ‘डॉ. कर्डिले यांच्यासारख्या युवा डॉक्टरांनी अभिनव उपचारपध्दती विकसित करणे हे कौतुकास्पद आहे. संशोधनावर भर देऊन शास्त्रीय पध्दतीने उपचार तंत्र विकसित केल्यामुळे याचा दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव पडेल, अशी मला आशा आहे.’

डॉ. कर्डिले व त्यांची टीम संचेती हॉस्पिटल येथे दर शुक्रवार व शनिवारी, सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत सल्ल्यासाठी उपलब्ध असेल.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZWRCG
Similar Posts
कामात आत्मा ओतल्याशिवाय समाजसेवा अशक्य : डॉ. के. एच. संचेती पुणे : ‘नेत्रसेवेच्या क्षेत्रात पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान झोकून देऊन काम करीत आहे. तन, मन आणि आत्मा कामात ओतल्याशिवाय अशी अखंड समाजसेवा करता येणे अशक्य आहे,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी काढले.
संचेती हॉस्पिटलमध्ये फास्टट्रॅक नी रिप्लेसमेंट सर्जरी सुविधा पुणे : गुडघा बदल शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसात घरी जाता येईल, अशा फास्ट ट्रॅक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांची सुविधा संचेती हॉस्पिटलने सुरू केली आहे. संचेती हॉस्पिटलने नुकतीच १२ डिसेंबर २०१८ रोजी यशस्वी ५३ वर्षे पूर्ण केली असून, ५४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, येथे तांत्रिकदृष्ट्या प्रगत शस्त्रक्रियांची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे
‘आचार व विचार यांच्यातील अंतर कमीतकमी असावे’ पुणे : ‘जीवनातील आचार व विचार यांच्यातील अंतर कमीतकमी झाल्यास त्याचा फायदा निश्‍चितच होतो. या शिबिरांच्या माध्यमातून फार मोठी संधी मिळालेली आहे,’ असे प्रतिपादन पोलिस आयुक्त के. वेकंटशम यांनी केले.
‘सर्जनशील कलेचा आस्वाद घेण्याची संधी गमवू नका’ पुणे : ‘सर्जनशील कलेचा आस्वाद घेण्याची संधी कधीही गमवू नका, कारण ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे,’ असे मत संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एच. संचेती यांनी व्यक्त केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language